'बॉम्बे (मुंबई) कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असोसिएशन' संघटना ही मुंबईमधील संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना ही गेली सहा ते सात दशकापासून कार्यरत आहे. या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आज पर्यंत शासकीय, निमशासकीय, खाजगी व्यवसायासाठी राज्यातीलच नव्हे तर देशातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यातूनच लाखो तरुण तरुणींना शासकीय निमशासकीय बँका कॉर्पोरेशन खाजगी क्षेत्रात उत्कृष्ट लघुलेखक, लिपिक टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळत आहेत. मुंबई जिल्ह्यात पूर्व पश्चिम व दक्षिण तिन्ही विभागात एकूण 150 शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहॅन्ड संस्था आहेत. या संस्थामार्फत कित्येक गरजूंना आज रोजगार उपलब्ध होत आहे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व संस्थांसाठी बॉम्बे (मुंबई) कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असोसिएशन ही संघटना या संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी साठी शिक्षण निरीक्षक कार्यालय बृहन्मुंबई दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग तसेच उपविभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग कार्यालय चार्निरोड रोड त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी वेळोवेळी जाऊन सतत पाठपुरावा करीत असते.
2017 मध्ये मॅन्युअल टायपिंग टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि संगणक युगात संस्था चालकांनी पदार्पण केले. भरभराटीत चाललेल्या व्यवसायात बदल झाल्याने थोडी घालमेल झाली पण संस्थाचालक सावरला आणि पुनश्च नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जोमाने विद्यार्थी घडविण्याच्या कामाला लागला. परंतु शासकीय भरती आणि नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने संस्थेत सद्य परिस्थितीत विद्यार्थी संख्या फारच कमी होताना दिसून आली. विद्यार्थी संखेत वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे टंकलेखन व लघुलेखन संस्था व अभ्यासक्रमा विषयी परिपूर्ण माहिती असलेले अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार बेडसे (IAS) हे परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदावर रुजू झाल्यानंतर संगणक टंकलेखन क्षेत्रात अनेक लक्षणीय बदल घडवून परीक्षेत चालणारे गैरप्रकार, LMS सॉफ्टवेअर, बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेरा संस्थेत लावण्याचे सक्तीचे करून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा घातला हे खरोखरच स्तुत्य आहे. संस्थाचालकांना याबाबतीत झालेल्या बदला विषयी पूर्ण माहिती देण्याच्या दृष्टीने मुंबई संघटनेने आजची शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या सांताक्रुज येथील साने गुरुजी विद्यालय शाळेच्या सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेच्या अध्यक्षपद डॉ. श्री नंदकुमार बेडसे साहेब यांना देण्यात आले आणि श्री. संतोष कंटे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक उत्तर विभाग, श्रीमती हेमलता गावित उपनिरीक्षक पश्चिम विभाग आणि श्रीमती संगीता माने शिक्षण उपनिरीक्षक दक्षिण विभाग यांनाही पाचारण करण्यात आले होते. जेणेकरून नूतनीकरण संस्था स्थलांतर मान्यता आणि संस्थेबाबतीत प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा तातडीने निर्णय होईल. विभागातील संस्थाचालक मोठ्या संख्येत उपस्थित होऊन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष विभागीय उपनिरीक्षक यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या आणि त्यांचे निरसन करण्यात आले. त्यावेळी बॉम्बे मुंबई कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रभाकर डंबल, सचिव श्री दिपक पाटील, कोषाध्यक्ष विक्रम सावरकर आणि सदस्य श्री अशोक अभ्यंकर, गोपाळ कृष्णन, विनय राने, खेमराज सिंग धानिक, दीपक खरात, पार्वती शिंदे, सरिता तावडे, राजन ठाकूर,सतीश पवार हे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रतिनिधी श्री विनय राणे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले. शेवटी संघटना ही संस्थेसाठी आहे संस्थेच्या अडीअडचणी या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील संघटनेच्या कार्यात बाधा अडचणी येतील असे कोणतेही नियमबाह्य करू नका बहिस्थ विद्यार्थी आपल्या संस्थेतून प्रविष्ट करू नका असे अध्यक्ष श्री प्रभाकर डंबल यांनी सांगितले. तसेच कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार बेडसे(IAS) साहेब यांनी सभेला उपस्थित असलेल्या सर्व संस्था चालकांना व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व काही विशेष सूचना त्यांनी दिल्या. संस्थाचालकांसाठी संस्थेच्या प्रलंबित असलेल्या नूतनीकरणाबाबत तसेच अनधिकृत संस्थांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सांगून बहुमूल्य मार्गदर्शन केले.
आजची कार्यशाळा यशस्वी होण्यास अत्यंत अल्पकाळात साने गुरुजी विद्यालयाचे सभागृह कार्यशाळेसाठी उपलब्ध करून देऊन मुख्याध्यापिका श्रीमती विनया बडगर आणि संघटना सदस्य श्रीमती सरिता तावडे यांनी मोलाचे काम केले. संघटनेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
Source: